दोनवडे : खुपीरे ता. करवीर येथील बजरंग सह. दूध व्यवसायिक दूध संस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.
संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शिवाजी पाटील यांनी सन 2023-2024 या आर्थिक वर्षात दुध पुरवठा केलेल्या सभासदांना गाय व म्हैशी साठी 10 टक्के रिबीट रक्कम 28,07,284/-इतकी तर 2,31,898/- इतका डिव्हिडंट (लाभांश )व संघ फरक रक्कम येत्या दसरा-दिवाळीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
संस्थेचे अहवाल वाचन सचिव संदीप वाळवेकर यांनी केले.
यावेळी दूध संस्थेचे संचालक के. डी. पाटील,कृष्णात बंगे, बळवंत पाटील,गजानन पाटील, धनाजी पाटील, लक्ष्मण जाधव, राजेश निकम,सरदार पाटील,मनीषा पाटील,कमल पाटील,सर्जेराव शिंदे, मधुकर कोळी, महेश कांबळे, दाजी पाटील, बळवंत जांभळे तसेच दत्त विकास संस्थेचे अध्यक्ष आनंदराव कृष्णा पाटील, सुभाना निकम,एस. डी. पाटील आदी उपस्थित होते.
संस्थेचे व्हा.चेअरमन दत्तात्रय मानकू पाटील यांनी आभार मानले .