Friday, January 16, 2026
Google search engine
HomeSocialकरवीर मतदारसंघातील शहरालगत असणारे कॉलनींचा विकास करू: आमदार धिरज देशमुख

करवीर मतदारसंघातील शहरालगत असणारे कॉलनींचा विकास करू: आमदार धिरज देशमुख

कोपार्डे (प्रतिनिधी):
करवीर मतदारसंघातील व शहरा लगत असणाऱ्या कॉलनीच्या समस्या जाणून घेण्यासाठी राहुल पाटील व राजेश पाटील यांनी सोलापूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांचे सोबत जिल्हा परिषद कॉलनी मध्ये भेट देवून त्यांनी शहरालगत असणाऱ्या कॉलनीमधील समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.

आज त्यांनी शहरालगत असणाऱ्या जिल्हा परिषद कॉलनी, अयोध्या कॉलनी, साई कॉलनी,महेश्वर कॉलनी, जय भवानी कॉलनी, लक्ष्मीनारायण कॉलनी, नागदेव कॉलनी इत्यादी कॉलनीच्या समस्या आमदार धिरज देशमुख यांनी ऐकून घेतल्या. यावेळी बोलताना राहुल पाटील यांनी सदर कॉलनी ह्या नागदेववाडी बालिंगा व पाडळी खुर्द या ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असून सदर ग्रामपंचायत या कॉलनी पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असल्याने आणि ग्रामपंचायतकडे असणारा निधी तोकडा पडत असताना स्वर्गीय पी.एन. पाटील यांनी आपले फंडातून बऱ्याच कॉलनीचे अंतर्गत व बाह्य रस्ते तयार केले असल्याचे नमुद करुन ,कचरा , गटर्सपाण्याचा निचरा इत्यादी अनेक अडचणी असल्याने या समस्या सोडवणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावेळी वेळ आमदार धिरज देशमुख यांनी लवकरच या कॉलनींच्या समस्या दूर करण्याचे आणि अनुदानाचे आश्वासन देवून कॉलनींचा विकास करण्याची ग्वाही दिल्याने कॉलनीवासी यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी श्री संजय कुमार देसाई व सौ कल्पना देसाई यांनी आमदार धीरज देशमुख तसेच राजेश पाटील राहुल पाटील यांना शाल व महालक्ष्मीची मूर्ती देऊन त्यांचे सत्कार केला तर निलेश पवार यांनी यावेळी प्रस्तावित केले.
तसेच यावेळी जिल्हा परिषद कॉलनीचे संचालक मोहन कांबळे बालिंगेकर यांनी जिल्हा परिषद कॉलनी मधील सर्व विकासाचे माहिती देवुन ईतर कॉलनीमध्ये यासारखा विकास झाला पाहिजे अशी मागणी केली.
सदर कार्यक्रमास जिल्हा बॅंकेचे संचालक राजेश पाटील,राहुल पाटील, श्री एस व्ही पाटील जिल्हा शिक्षक बँक संचालक, श्री.मोहन काबळे संचालक जि.प. कॉलनी,, रघुनाथ कांबळे,भिमराव कांबळे, दिलीप माने सरचिटणीस प्राथमिक शिक्षक संघ, श्री. राहुल बागडे, श्री. निलेश पोवार,श्री. संतोष गोसावी, श्री. अमजद मोमीन, श्री. मनोज बुरुड, श्री. प्रवीण भालेकर, श्री आर एस पाटील, श्री उदय देसाई, श्री एस एल पाटील, श्री.दिगंबर सातपुते, शुभम मोहन कांबळे, ऋषिकेश कांबळे ,एस.एल.पाटील,खर.एस.पाटील व ईतर कॉलनीवासीय उपस्थित होते.
या वेळी आभार मोहन कांबळे बालिंगेकर यांनी मानले.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News