कोल्हापूर प्रतिनिधी: कागल नंतर अतिशय चुरशीचा समजल्या जाणाऱ्या राधानगरी- भुदरगड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार के.पी.पाटील व ए. वाय.पाटील हे मेहुणे -पाहुणे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.दोघानीही अजित पवार गटास सोडचिठ्ठी देउन महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळवण्याची तयारी सुरू केली आहे.आता या पैकी कोणाला उमेदवारी दयावयाची या बाबत नेत्यांच्या समोर पेच उभा आहे. त्यासाठी पक्ष नेतृत्वाने आता चाचपणी सुरू केली आहे.कोण निवडून येइल हा क्रायटेरिया निश्चित केला आहे.त्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत झालीआहे अशी माहिती हाती आली आहे.
गेल्या कांही दिवसापासून राधानगरी विधानसभा मतदार संघातील राजकारणात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहेत. के.पी.पाटील , ए.वाय. पाटील या मेहुणे पाहुणे तसेच भाजपला रामराम ठोकलेले ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई यांनी शरद पवार याची कोल्हापूर दौऱ्यात भेट घेऊन राष्ट्रवादी मधुन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. सर्वजण गुडघ्याला बाशिंग बांधुन निवडणूक मंडपात उभे आहेत पण के.पी.पाटील व ए.वाय.पाटील या दोन मातब्बरां पैकी कोणाला उमेदवारी दयावयाची या बाबतचा पेच निर्माण झाला आहे. के.पी.पाटील यांची भुदरगड तालुक्यात तर ए.वाय.पाटील यांची राधानगरी तालुक्यात मोठी ताकद आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोण विजयी होईल हा निकष ठरवला आहे.त्या नुसार या मेहुणे पाहुण्यांची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या जोडण्या लावल्या आहेत.