शिरोळ : प्रतिनिधी : शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गास विरोध करणारे ठराव सर्वच सहकारी संस्थांनी संस्थेच्या वार्षिक सभेत करावेत असे आवाहन शिरोळ तालुक्याचे नेते आणी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांनी केले आहे
श्री यादव म्हणाले की शक्तिपीठ महामार्गामुळे शिरोळ हातकणंगले आणि करवीर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गासाठी संपादित केल्या जाणार आहेत त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे मुश्किल होणार आहे यामुळे या शक्तीपीठ महामार्गास विरोध करणे आवश्यक आहे शिरोळ तालुक्यातील सर्व विकास सेवा संस्था पतसंस्था दूध संस्था त्याचबरोबर अनेक सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा होत आहे या वार्षिक सभेत शेतकऱ्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ नये याकरिता शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात ठराव करणे गरजेचे आहे त्यामुळे सर्वच सहकारी संस्थांनी आपल्या वार्षिक सभेत शक्तिपीठ महामार्गास विरोध करणारा ठराव करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा त्याचबरोबर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत शक्तिपीठ महामार्गास विरोध करणारा ठराव करून शक्तिपीठ महामार्ग होऊ नये याकरिता प्रयत्न करावेत असे आवाहन यादव यांनी केले