कोल्हापूर प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील खुपीरे परिसरात आज तिसऱ्या दिवशीही सायंकाळी ड्रोनचा वावर दिसला.या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.पोलिसांकडून तपासणी सुरू आहे पण ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही असे सांगण्यात आले. वन विभागाचे हे ड्रोन असल्याची शक्यता होती .पण हा ड्रोन वन विभागाचा डोंगर परिसर सोडून खुपीरे , वरणगे या गावात कसा अशी शंका व्यक्त होत आहे. नागपूर रत्नागिरी महामार्गाचा व कोल्हापूर गगनबावडा मार्गाचे सध्या काम सुरू आहे.त्याच्या सर्व्हे साठी ड्रोनचा वापर असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.करवीर पोलीसांशी संपर्क साधला असता चौकशी सुरू आहे.अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही असे सांगितले.




