कोल्हापूर :सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत व्यसनाधीनता, व्यावस्तवता व उपाय या विषयावरील कार्यशाळे प्रसंगी बोलताना मुंबई येथील मानसिक रोग तज्ञ व मेरी प्यारी जिंदगी या व्यसनाधीनतेच्या विरोधात काम करणाऱ्या मोहिमेचे डॉ.धारव शहा यांनी उपस्थितांना संबोधित केले.
समाजात आकर्षक जाहिरातीमुळे तरुण वर्ग अतिशय कमी वयापासून व्यसनांकडे आकर्षला जात असून सरासरी एका वर्षात दारूमुळे तीस लाखांच्या आसपास तर तंबाखू सेवनामुळे अंदाजे 80 लाखाच्या आसपास जगभरात मृत्यू होत असून यातील भारतामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक बाब असून याबाबत जाणीव जागृती व पर्यायाने निरोगी आयुष्य जगण्यासाठीच्या उपाययोजनांची गरज असल्याचे प्रतिपादन करून व्यसनांमुळे विविध सामाजिक समस्या जसे की गुन्हेगारी, अपघात,नैराश्य, आर्थिक दुर्बलता, सामाजिक प्रतिष्ठेची हानी या व अशा अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते यावर शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या स्तरावर काही काम होत असून प्रमाणात होत असून त्यांची व्याप्ती वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यशाळेचे आयोजन व प्रास्ताविक केले डॉ. दीपक भोसले यांनी केले कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी समाजामध्ये जाऊन जाणीव जनजागृतीच काम करतील या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले
याप्रसंगी डॉ.सोनिया राजपूत, डॉ. कालिंदी रणभरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली कोमल तायडे यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन विशाखा वानखेडे यांनी केले कार्यशाळेमध्ये ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.




