कोथळी (तानाजी पोवार):
राजकारणात विचारांचे धृवीकरण होत असताना पुरोगामी विचार जपून सामान्यांच्या हितासाठी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाने घेतला आहे करवीर विधानसभा मतदारसंघात राहुल पाटील यांच्यासोबत राहुल धर्मनिरपेक्ष विचार जोपासत शेकापच्या सामान्य, कार्यकर्त्यांना सन्मान जनक न्याय देऊ स्वर्गीय पी एन पाटील यांनी मोठ्या मनाने शेकांबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या निर्णयाशी शेकाप कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पाठीशी उभे राहावे असे आव्हान माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केले ते कोथळी येथील करवीर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी संपतराव पवार पाटील म्हणाले शेकाप आत्तापर्यंत तत्वनिष्ठ विचारसरणीमुळे अभेद्य राहिला महाविकास आघाडी पुरोगामी विचारसरणी जपणारे आहे यामुळेच कष्टकरी माणसाला न्याय देण्यासाठी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील म्हणाले स्वर्गीय पी. एन. पाटील व संपत बापूंनी कार्यकर्त्यांना बळ दिले. संघर्ष केला तरी तत्त्वाने लढले यामुळेच दोन्ही पक्षातील कार्यकर्ते सहकार्याची भावना ठेवून एकत्र आले आहेत त्यावेळी महाराष्ट्र पुरोगामी युवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष क्रांतिसिंह पवार पाटील म्हणाले समाजातील विधायक कामांचा वारसा शेका पला आहे आत्तापर्यंत कष्टकऱ्यांना न्याय देण्याचे काम शेकापने केले आहे. सत्तेतून सामान्यांचे कल्याण करण्यासाठी काँग्रेस सोबत आघाडी केली आहे यावेळी करवीर तालुका शेका पक्षाची चिटणीस केरबा भाऊ पाटील म्हणाले शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसची आघाडी नव्या पर्वाची नांदी आहे हीच विचारसरणी जपत इथून पुढच्या सर्व निवडणुका एकत्र लढवल्या जातील भोगावतीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील म्हणाले शेकापक काँग्रेस ही ऐतिहासिक युती आहे भोगावतीच्या नव्या राजकीय परवाला यशस्वी सुरुवात झाली आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर महाळुंगे चे सरपंच प्रमोद पाटील संभाजी पाटील शरद पाटील यांची भाषणे झालेत मेळाव्यास भोगावतीचे संचालक अक्षय पवार पाटील दत्ता हणमा पाटील सरदार पाटील अमित कांबळे एकनाथ पाटील भोगावती शिक्षण प्रसारक चे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील पी एस पाटील यांच्यासह भोगावती साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अक्षय पवार पाटील यांनी मानले