Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomePOLITICALकागल मध्ये चहापेक्षा जादा गरम झालेली किटलीच बदला: आमदार सचिन अहिर

कागल मध्ये चहापेक्षा जादा गरम झालेली किटलीच बदला: आमदार सचिन अहिर

मुंबई प्रतिनिधी: छत्रपती शाहू महाराजांचे वंशज, राजे समरजितसिंह घाटगे यांचे भाषण आज मी लक्षपूर्वक ऐकले. विकासाचे एक निश्चित व्हिजन त्यांनी नजरेसमोर ठेवले आहे.छत्रपती शाहू महाराजांचा वारसा ते कृतीतून चालवित आहेत. अशा समाजभिमुख दृष्टी व शाहूंचे वंशज असलेल्या राजे समरजितसिंह घाटगे यांना विधानसभेत पाठवणे काळाची गरज आहे. यामध्ये आम्ही कमी पडणार नाही, असे प्रतिपादन आमदार सचिन अहिर यांनी केले.

येथील श्रमिक जिमखाना मैदानात कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील मुंबईस्थित नागरिकांच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने अध्यक्षस्थानावरुन साधताना ते बोलत होते.
आमदार अहिर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना पुढे,
म्हणाले,कागल मध्ये
चहापेक्षा किटलीच जादा गरम झालेली आहे.ही गरम झालेली किटलीच बदला,असे आवाहन करून ते म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधी,
वर्षातून किमान दोन वेळा मुंबईकरांशी संवाद साधणे अपेक्षित होते.मात्र ते पाच वर्षातून एकदाच मतदानापूरते मुंबईकरांकडे येतात निवडणुकीनंतर त्यांच्याकडे पाहिल्या नाहीत किंवा येथील गडहिंग्लज उत्तुर आजरा स्थित नागरिकांचे काय प्रश्न आहेत हे कधीही समजून घेतले नाहीत.
या पूर्ण करण्याची जबाबदारी राजे आता तुमच्यावर येणार आहे. असे सांगून ते म्हणाले
मुंबईमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने पश्चिम महाराष्ट्रसाठीचे भवन उभारण्याच्याही केवळ घोषणाच केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कागलमधील निवडणुक दोन व्यक्तीमध्ये नव्हे तर निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर अशा दोन प्रवृतींमध्ये होत आहे.मुंबईच्या चाळीत व खोल्यांमध्ये या नागरिकांचे काय हाल होतात हे मी जवळून पाहिले आहे.त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपल्बध करुन देण्याचा आमचा अजेंडा आहे.केवळ कागल-गडहिंग्लज -उत्तूरच नव्हे तर,मुंबई -पुण्याच्या जनतेनेच आता ही निवडणूक हातात घेतली आहे.विकासकामांपेक्षा आमच्यावर टीका करणा-यांना ही स्वाभिमानी जनताच उत्तर देईल.
आमदार सुनिल शिंदे म्हणाले,छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज असलेल्या समरजितसिंह घाटगेंकडे केवळ कागलकरच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र मोठ्या अपेक्षेने पाहत आहे.कागलच्या कट-कारस्थाने व सत्तेच्या मस्तीच्या राजकारणाला त्यांचे विकासाचे व्हिजन पुरुन उरेल.कागलमध्ये भाकरी करपण्याआधी परता.

आमदार अजय चौधरी म्हणाले,सत्ता व पैशाच्या मोहापायी गद्दारी करणा-यांना मुंबईकर कागलमध्ये जाऊन पाडण्यात आघाडीवर असतील.

संजय कांबळे,बाळासो गुजर,शिवानंद माळी यांनीही मनोगत व्यक्त केले.

निवृत्ती देसाई यांनी स्वागत केले.अशोक तर्डेकर यांनी आभार मानले.

छायाचित्र मुंबई येथे कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने संवाद साधताना आमदार सचिन अहिर, व्यासपिठावर आमदार सुनील शिंदे,आमदार विजय चौधरी,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व इतर
*चौकट१*
*समरजीतराजेंचा चाकरमन्यांना अनोखा सलाम..*

उत्तूर येथील टॅक्सी व्यवसायिक सुभाष काळे यांच्या टॅक्सीतून कार्यक्रम स्थळापर्यंत समरजितसिंह घाटगे यांनी अन्य टॕक्सी चालकांसह प्रवास केला. प्रवासी टॅक्सीच्या भव्य मिरवणूक घटनास्थळी आली त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. घाटगे यांनी यानिमित्ताने टॕक्सीचालकांसह तमाम चाकरमन्यांचा गौरवच केला.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News