मुरगुड: मुरगुड मधल्या साई कॉलनीत राहाणाऱ्या एका शिक्षकाने कौटुंबिक वादातून आपल्या शिक्षक पत्नीचा खून केला आहे. परशुराम पांडुरंग लोकरे असे संशयित आरोपी शिक्षकाचे नाव असून मयत शिक्षिका सविता परशुराम लोकरे (वय ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपीला मुरगूड पोलिसांनी अटक केली आहे.
कागल तालुक्यातील मुरगुड येथील साई कॉलनीत शिक्षक परशराम पांडुरंग लोकरे शिक्षिका सविता परशुराम लोकरे आपल्या दोन मुलासह राहत होते. गेले अनेक वर्ष त्यांच्यात कौटुंबिक वाद होता याच वादातून मंगळवारी सकाळी पती-पत्नीत जोराचे भांडण झाले. यातून पती परशुराम पांडुरंग लोकरे यांने पत्नी सविताच्या डोक्यात वरवंटा घातला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मुरगूड पोलिसांना मिळतात तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना दिली. तात्काळ देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी परशराम लोकरे याला ताब्यात घेऊन अटक केली. घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली झाले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी करे करत आहेत.