Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomePOLITICALलाडक्या बहि‍णींची भाऊबीजही दणक्यात..

लाडक्या बहि‍णींची भाऊबीजही दणक्यात..

बीड : विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्ष जोराने कामाला लागले असून राज्य सरकारच्यावतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमध्ये मिसळत आहेत. राज्यातील लाडक्या बहि‍णींना अभिवचन देत लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकांपूर्ती नसून पुढील 5 वर्षांपर्यंत चालणार असल्याचा विश्वासही देत आहेत. मात्र, त्यासाठी महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद द्यावेत,असे आवाहन या नेतेमंडळींकडून केले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यचा दौरा आखला असून सध्या ते मराठवाड्यात आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहि‍णींशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा बहि‍णींना लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितलं.
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे तीन हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून आत्तापर्यंत तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ झाला आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अधिक खुश आहेत. तसेच, महिन्याला 1500 रुपये जमा होण्याची वाट पाहतात. राज्य सरकारने ऐन रक्षाबंधन सणाच्या अगोदर महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्यांचा एकत्रित हफ्ता 3000 रुपये जमा केला होता. त्यानंतर, सप्टेंबर महिन्यातील 1500 रुपयांचा हफ्तादेखील 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. आता, दिवाळीच्या भाऊबीजलाही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News