मुंबई :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली.
योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे चार्ज आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे ही बाब निदर्शनास आली आहे. अशा बँकांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.अशी माहिती बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सिडींग नसल्याने लाभ मिळत नाही. याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने दि. २ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी अशा सूचना बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव,सचिव राजेश गायकवाड, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.



