कोल्हापूर (प्रतिनिधी) : खुपिरे ग्रामपंचायत हनुमान मंदिर, आंबेडकर भवन असे विविध विकास कामे करून खुपिरे गावचा कायापालट माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केला असे गौरवोद्गार माजी सरपंच संजय डी पाटील यांनी काढले
खुपिरे येथे विविध विकासकामांचे उद्घाटन माजी आमदार नरके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी माजी सरपंच संजय पाटील बोलत होते. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावातील विकास कामांचा शुभारंभ माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच तृप्ती पाटील तसेच कारखान्याचे संचालक बी. बी. पाटील, तानाजी पाटील यांच्यासह खुपिरे गावातील महिला व नागरिक उपस्थित होते.