कोल्हापूर : स्वमग्नता हे विकासाच्या टप्प्यात अडथळे असणारे अपंगत्व आहे. अशी मुले आपल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाहीत. स्पर्श, गंध, दृष्टी, आवाजाच्या संवेदना अतिशय तीक्ष्ण किंवा अत्यंत बोथट असल्याने ही मुले कित्येकदा संवेदनांच्या होणाऱ्या या गोंधळाने सैरभैर होतात. सार्वजनिक अस्वच्छतेपायी रोगप्रतिकारक्षमता कमी असल्याने सतत आजारीही पडतात. 2 ऑक्टोबर म. गांधी जयंतीच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र हौ.सोसायटी, राजारामपुरी येथील अमन फाउंडेशनच्या केअर ऑटिझम सेंटरच्या स्वमग्न मुलांनी आपल्या पालकांसह परिसर स्वच्छतेत सहभाग घेतला . रस्त्यावरील प्लास्टिक, कागदाचा कचरा वेचून समाजासमोर स्वच्छता राखण्याचे धडे देऊन बापूजींना अभिवादन केले.
या उपक्रमाचे नियोजन अमन फाउंडेशनच्या दीपा शिपूरकर ,कपिल मुळे यांनी केले तर विशेष शिक्षिका अमृता भारती, आरती बाणेदार यांनी परिश्रम घेतले. अमन , आरव , शिवांश, श्रीयश , आरोही, वेद ही मुले आपल्या पालकांसह सहभागी झाली होती.