मुंबई: नवरात्रीत सोने-चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड खूपच वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीने मोठा उच्चांक गाठला, तर चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली. सप्टेंबर महिन्यात सोने चांदीच्या दरात अनेकदा चढ-उतार दिसून आली. आता ऑक्टोबर महिन्यातही हे दर प्रचंड वाढलेले दिसत आहेत. अशातच आज (4 ऑक्टोबर 2024) सोन्याच्या किंमतीतील हे बदल किती रूपयांनी झाले आहेत
Goodreturns वेबसाईटनुसार, गुरूवारी (03 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 77,560 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 110 रूपयांनी वाढला झाली असून याची किंमत 77,670 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,100 रूपये होता. जो 100 रूपयांनी वाढला असून त्याची किंमत 71,200 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 95,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.