कळे / प्रतिनिधी
कळे विद्यामंदिर कळे च्या १९७७-७८ च्या विद्यार्थ्यांनी कळे प्रशाला प्रणित व माजी मुख्याध्यापक रा.वि.अष्टेकर प्रेरित श्रीसमर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था स्थापन केली आहे. उतार वयाकडे झुकलेल्या या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत स्वच्छता मोहिमे पासून रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वैरण दान,दत्तक मुली,दत्तक शाळा, उद्बोधन शिबीर असे अनेक उपक्रम राबविले आहेत.
२ आक्टोबर या गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून चिंचवडे तर्फ कळे येथील ऐतिहासिक वाघजाईच्या डोंगरावर मंदिर परिसराची स्वच्छता केली.पावसाळ्यात वाढलेली तणकटे,सुकलेल्या काटक्या जमा करून पेटवून दिल्या, जेणेकरून सुरू होणाऱ्या दसरा सनाला नवरात्र बसणार्या भक्तांना त्याचा त्रास होणार नाही. तणकटांनी व झुडुपांनी कोंडलेले मंदिर त्यांनी मोकळे केले. यात संस्था अध्यक्ष रामचंद्र बच्चे, उपाध्यक्ष बाजीराव वर्पे,सचिव संभाजी दांगट, सहसचिव प्रा.पी.जे.पाटील, सदस्य शिवाजी पाटील, आर्.आर् पाटील ,शरद दंताळ,आनंदा पाटील आदी उपस्थित होते. या मोहिमेने विभागात त्यांचे कौतुक होत आहे.




