कोल्हापूर : श्रीकांत पाटील
दलित, मागास, वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय यासह संधी मिळत नाही. खाजगीकरणामुळे आरक्षण संपवले जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण महत्वाचे आहे. संविधानाच्या रक्षणासाठी आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा काढून टाकण्याची गरज आहे, इंडिया आघाडी हे काम करील. लोकसभा व राज्यसभेत जातनिहाय जनगणना मंजूर करू अशी घोषणा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी केली.




