कन्या व कुमार विद्यामंदिर पन्हाळा इयत्ता पहिली ते चौथी च्या मुलींनी सरदार गायकवाड याच्या मार्गदर्शनाखाली लेझीम खेळून या सदस्य पाहुण्यांचे पन्हाळगडावरील बालेकिल्ला या ठिकाणी स्वागत केले गेले. मुलीनीं पारंपारिक वेशभूषा केली होती. तसेच मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. ह्वाजोंग ली यांनी टाळ्यांच्या गजरात या मुलांचे स्वागत स्वीकारले.
युनेस्को जागतीक वारसा नामांकन मराठा लष्करी स्थापत्य शृंखला अंतर्गत पन्हाळा किल्ला या नामांकित स्मारक होत आहे.या प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी करण्याकरिता ICOMOS तज्ञ दि. २४ सप्टेबर ते दि. ९ ऑक्टोबर २०२४ दरम्यान हे सदस्य भारतात असून महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी व तामिळनाडूतील राज्यास भेट देत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील आकरा व तामिळनाडूचा जिंजी या किल्ल्यांचा समावेश यामध्ये आहे.किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव शासनाने पाठविला होता. त्यांच्या नियोजित दोऱ्या प्रमाणे आज ५ ऑक्टोंबर ला पन्हाळगड ला भेट दिली. हे सदस्य सकाळी ९.०० वाजता तीन दरवाजा मार्गे गडावर आले आहेत. तसेच त्यानंतर त्यांनी पुसाटी बुरुज,धान्याचे कोठार, धर्मकोटी,चार दरवाजा परिसर, पावनगड, काली बुरुज, या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या . तसेच आज व्हॅल्यू ग्रँड या हॉटेलमध्ये नागरिक, प्रतिनिधी शासकीय अधिकारी व सदस्य ह्वाजोंग ली यांच्यात बैठक होणार आहे.