कोल्हापूर : (श्रीकांत पाटील)
करवीर तालुक्यातील काँग्रेस चे नेते तसेच यशवंत सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी व हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत शिवसेना नेते माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नरके गटामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी अध्यक्षस्थानी कुंभी कासारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष निवास वातकर होते.
यावेळी नंदाताई चौगुले हारपवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गोकुळ चे संचालक अजित नरके, एस आर पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, आनंदराव पाटील-कुडित्रेकर, संग्राम भापकर, संदीप भापकर, सर्जेराव राऊ पाटील-कोपार्डे, शिवाजी खाडे, बाळ पाटील, एस के पाटील, दिनकर चौगुले, सरदार पाटील -तांदुळवाडी यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, शिवसेनेचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.