बाणेर येथील एका हॉस्पिटलमध्ये महिलेवर हॉस्पिटलच्याच सुपरवाझरने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिला हॉस्पिटलमध्ये हाऊसकिपींगचे काम करते. याबाबत महिलेने सुरुवातीला हॉस्पिटलच्या सिक्युरीटी मॅनेजरकडे तक्रार केली होती.
मात्र त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. यानंतर पुढे या महिलेने चतुः श्रृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिसांनी सोमनाथ लक्ष्मण बेनगुडे (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे पिंपरी-चिंचवड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
बेनगुडे हादेखील हाऊसकिपींग सुपरवाझर म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करतो. याबाबत २९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.