लातूर :
लातूरमधील पुरणमल लाहोटी सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहणाऱ्या सुमारे ५० विद्यार्थिनींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाली आहे. त्रास झालेल्या विद्यार्थिनींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. तसेच सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.




