Sunday, December 7, 2025
Google search engine
HomePOLITICALसर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार - आमदार प्रकाश आबिटकर

सर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार – आमदार प्रकाश आबिटकर

राधानगरी – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राधानगरी तालुक्यातील जवळपास ४० हजार महिलांना लाभ झाला असून यामाध्यमातून कुटुंब आणि स्वावलंबी हातांना मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.रोजगार हमी योजनेद्वारे सर्वसामान्य लोकांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. यापूर्वी सरकारी कामासाठी वेळ,श्रम व पैसा याची कसरत करावी लागत होती परंतु शासन आपल्या दारी यामाध्यमातून खेड्यापाड्यात लोकांची सहजसोपी झाली आहेत. निराधारांना पेंशन मिळाल्यामुळे आपल्याला आशिर्वाद मिळेल. त्यामुळे यापुढे सार्वजनिक हितासाठी काम करण्यासाठी मोठे बळ मिळेल. अशा सर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

नरतवडे (ता.राधानगरी) येथे संजय गांधी निराधार योजना, प्राधान्य लाभार्थी कुटुंब रेशनकार्ड मंजुरी, पंचायत समिती शौचालय अनुदान या मंजुरी पत्राच्या वाटपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी प्रसाद चौगले होते.
यावेळी नंदकिशोर सुर्यवंशी, अनंत घोलकर, सुभाष पाटील, कुंडलिक पाटील, राजेश मोरे, मानसिंग पाटील, राजेंद्र वाडेकर,लहू जरग,डी पी पाटील, अजित देसाई, विश्वास राऊत,विद्या सुर्यवंशी, वसुधा जाधव आदिंसह शासकीय अधिकारी, कर्मचारी पदाधिकारी, मान्यवर,लाभार्थी उपस्थित होते.तहसीलदार अनिता देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक, विश्वास आरडे यांनी सुत्रसंचालन तर सिताराम खाडे यांनी आभार मानले.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News