कोल्हापुर: विधानसेभेची आचारसंहिता कधी लागेल ? या भिती पोटी मंजुर कामाची प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी जिल्ह्यातील ठेकेदारांची जिल्हा परिषदेत झुंबड सुरू आहे .यामुळे बांधकाम विभागात मोठी गर्दी झाली आहे.
जिल्ह्यातील अनेक गावाकरिता जिल्हा वार्षिक आराखडा, योजना,दलित वस्ती सुधारणा निधी, आमदार फंड,खासदार फंड ,गौण खनिज उत्खनन या माध्यमातून कोट्यवधी रूपयांच्या कामाची मंजुरी देण्यात आली आहे.