यादववाडी :कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उचगावाचा सर्वागीण विकास केला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून पुढच्या पिढीला घडविण्याचे कार्य उल्लेखनीय आहे. असे प्रतिपादन कोल्हापूर दक्षिणचे आम. ऋतुराज पाटील यांनी केले.
मनेरमळा अंतर्गत मुख्य रस्त्याचं उद्घाटन व वि.म यादववाडी स्मार्ट टू ग्लोबल स्कूलचे उद्घाटन आम. सतेज पाटील,दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील (दादा ) यांच्या प्रयत्नातून दोन कोटी पन्नास लाख रुपये खर्चून सदरचा सिमेंट काँक्रीट चा सुसज्ज रस्ता व गटर्सचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले की, लोकसहभागातून साकारलेल्या विद्या मंदिर यादववाडी शाळेतून सुसंस्कृत विद्यार्थी घडावेत, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यां घडावेत असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.प्रास्ताविक मुख्याध्यापक ए के पाटील यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य श्रीधर कदम, वातकर सर, शाळेच्या अध्यक्षा संजना बनसोडे, यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास आम.सतेज पाटील , सरपंच मधूकर चव्हाण, उपसरपंच तुषार पाटील,ग्रामपंचायत सदस्य श्रीधर कदम, वैजयंती यादव ,सचिन देशमुख, सचिन गाताडे, गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील, सामाजिक कार्यकर्ते अजित माने,माजी सभापती सुनील पोवार, दीपक पाटील, रवी काळे,बाळासाहेब यादव, शामराव यादव, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गाढवे, गोपीशेठ मणेर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक , विद्यार्थी उपस्थिती होती. आभार शिक्षक राहुल कदम यांनी मानले.