Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALशिंगणापूरात काँग्रेसला खिंडार,800हून अधिक कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत..

शिंगणापूरात काँग्रेसला खिंडार,800हून अधिक कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत..

शिंगणापूर, ता.१० : काँग्रेस चे कट्टर समर्थक समजले जाणारे शिंगणापूर ग्रामपंचायत सदस्य अभिजित अंबादास बागडे (प्रभाग क्र.१ गणेश नगर) यांनी दुपारी ८०० पुरुष व महिला कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. वर्षोनुवर्षे काँग्रेस शी एकनिष्ठ राहून सुद्धा सहकारी कामात सहकार्य करत नसल्याने व काँग्रेस च्या ताब्यात ग्रामपंचायत असताना सुध्दा सरपंच रसिका अमर पाटील आमच्या प्रभागाला जाणून – बुजून डावलत असल्याने कंटाळून हा निर्णय घेतल्याचे बागडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
 सतेज उर्फ बंटी पाटील यांचे कट्टर समर्थक असून सुध्दा शिंगणापूर ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाने तिकीट न दिल्याने अभिजित बागडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत विजयी झाले. निवडून आल्यावर गावातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहामुळे सत्ताधारी काँग्रेस गट बागडे यांच्या प्रभागातील कामाकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत बागडे यांनी व्यक्त केली. आमदार चंद्रदीप नरके यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून शिंगणापूर पाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी ७५ लाख रुपये निधी मंजूर केला. पण गणेश नगर प्रभाग क्र मध्ये शिंगणापूर सरपंच रसिका अमर पाटील यांनी जिथे पाईपलाईन खराब झाली आहे. तिथे आम्ही १० – १० फुटांचे तुकडे घालून देते असे आश्वासन दिले होते. पण वास्तवात संपूर्ण पाईपलाईन बदलणे गरजचे असताना तसे हेतुपरस्सर प्रभाग क्र. १ ला डावलले गेले. 
                       पुढे बागडे म्हणाले काँग्रेस मध्ये १ काम असेल तर १० वेळा हेलपाटे घालावे लागतात त्याउलट शिंदेच्या शिवसेनेत एक फोन केला कि काम पूर्णत्वास जाते. निवडून येवून सुद्धा विकासकामांसाठी निधी नाही, जन्मापासून काँग्रेस शी एकनिष्ठ राहून पदोपदी मिळालेली वागणूक मनाला सलत होती. या सर्व गोष्टींना कंटाळून आम्ही शिवसेना जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे बागडे यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थित शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
                         यावेळी ग्रामपंचायत सदस्य सविता सावरे, जालिंदर मुंडे, (आबा) रामचंद्र सावरे, अमर सुतार, दिलीप सुतार, अनिल मोरे, बापू कांबळे, शंकर चौगले पोपट दिवसे, (अंकल) बबलू गवळी यांच्यासह ८०० च्या घरात महिला व पुरूष कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर शहरातून रॅली काढण्यात आली. 
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News