Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALहि.. तर नरकेंची जुनी सवय : राहुल पाटील

हि.. तर नरकेंची जुनी सवय : राहुल पाटील

कोल्हापूर (श्रीकांत पाटील):
विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजणार आहे  तत्पूर्वीच  करवीर तालुक्यात संभाव्य उमेदवारांच्या एकमेकावर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दिवंगत माजी आमदार पी एन पाटील यांनी केलेल्या कामाचे श्रेय विरोधक लाटत आहेत. त्यांनी मंजूर केलेली व पूर्ण झालेली कामे लोकार्पण करण्याच्या वेळी विरोधक स्वतःचे बोर्ड लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही विरोधकांची जुनी सवय आहे असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी केला.
खुपिरे (ता. करवीर) येथे जनसंवाद यात्रेदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.
राहुल पाटील म्हणाले विरोधकांच्या दहा वर्षाच्या काळात धामणी प्रकल्प बंद पडला होता त्याच्यावर एकानेही आवाज काढला नाही सर्वप्रथम दिवंगत माजी आमदार पी एन पाटील यांनी यावर आवाज उठवला. त्यांनी हा प्रकल्प मंजुरी पासून ते पूर्ण होईपर्यंत प्रयत्न केले आता विरोधक श्रेय लाटत आहेत. विरोधकांनी धामणी प्रकल्पासाठी साधी एक मातीची पाटी सुद्धा टाकली नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांपुढे बोर्ड लावून स्टंटबाजी सुरू आहे असा आरोपही केला.
राहुल पाटील म्हणाले जनतेने संधी दिल्यास युवकांसाठी कोकणात इको टुरिझम सारखे प्रकल्प राबवण्याचा संकल्प आहे. महिलांसाठी वेगळ्या योजना राबवण्याचा मानस आहे असेही राहुल पाटील म्हणाले.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News