दिंडनेर्ली प्रतिनिधी(सागर शिंदे):
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून विविध विकास कामे मार्गी लावता आली याचे समाधान आहे. तुमचा अशिर्वाद असाच पाठीशी राहो असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथे १० कोटी रुपयांच्या निधीतून झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व शुभारंभप्रसंगी आमदार ऋतुराज पाटील बोलत होते .
करवीर तालुक्यातील दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दिंडनेर्ली या गावात नागरी सुविधा, जनसुविधा जन जीवन,डोंगरी विकास, २५/१५,डी.पी.डी.सी,
या योजनेच्या माध्यमातून ग्राउंड क्रीडांगण, दिंडनेर्ली ते वडगांव रस्ता डांबरीकरण, आर.सी.सी.गटर्स, गणेश मंदीर सरंक्षित भिंत बांधणे,पेव्हिंग ब्लॉक बसविणे, दिंडनेर्ली गावास पाणी पुरवठा योजना, मेटील ओढ्यावर पूल बांधणे,मेन रोड रस्ता डांबरीकरण, दिंडनेर्ली गावातील अंर्तगत रस्ते,राजाराम तालीम सभागृह ,दिंडनेर्ली ते इस्पुर्ली रस्त्यावर साकव बांधणे, रस्ता डांबरीकरण, हरिजन वस्ती स्मशानशेड सुशोभिकरण आदी १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
आमदार ऋतुराज पाटील यांनी
आमचे नेते माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण मतदार संघातील दिंडनेर्ली या गावात कोट्यावधी रूपयांचा निधी विविध विकास कामांसाठी लावण्याचे पुण्य मला मिळाल्याचे सांगितले.
यावेळी दिंडनेर्ली गावतील रस्ते, पुल ,व्यायामशाळा, आदी कामांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी आणल्याबद्दल नागरिकांनी महिलांनी आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार मानले.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी आजी माजी सैनिकांची भेट घेतली. त्यांच्याही मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी सरपंच सौ. मंगल प्रकाश कांबळे, उपसरपंच उमेश पाटील, माजी सरपंच संभाजी बोटे, शांताराम बोटे, दिगंबर पाटील, बाळासो पाटील, सुहास पाटील, संदीप पाटील, संभाजी राघू बोटे, दत्तात्रय जाधव, राजेंद्र चौगले, सर्जेराव काळुगडे, संदिप चौगले, एन.के. पाटील, महादेव जाधव, काशिनाथ मेटील, शांतिनाथ बोटे, प्रविण पाटील, सदाशिव बेडगे, भैरीनाथ बोटे, रामचंद्र एकले, कृष्णात बोटे, बाळासो मेटील, कुमार मेटील, उदय भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.