दिंडनेर्ली : सागर शिंदे
प्रवासी टिकला तरच एस टी.टिकणार असे म्हंटले जाते.त्यामुळेच राज्य परिवहन संभाजीनगर आगाराच्या वतीने सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेमध्ये ‘ प्रवासी राजा दिन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमा दरम्यान कोल्हापूर एस.टी.महामंडळाचे विभाग नियंत्रक तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून प्रवाशांच्या कडून प्राप्त होणाऱ्या अडीअडचणी, तक्रारी व सूचना विचारात घेऊन त्यावरती कार्यवाही करणार आहेत. कित्येक वेळा तांत्रिक कारणामुळे किंवा एसटी बसेसच्या कमतरतेमुळे प्रवासी व चालक,वाहक यांचे मध्ये वादाचे प्रसंग होतात,प्रवाशांना एसटी बसच्या अनियमित फेऱ्यामुळे त्रास सहन करावा लागतो. काहीवेळा चालक,वाहक यांच्याही कामातील चुकामुळे प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्यक्षात मार्गावरती घडणाऱ्या घटना,अडीअडचणी अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे थेट प्रवासी ,अधिकारी,चालक, वाहक यांच्यामध्ये संवाद साधून अडचणी समजून घेण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दुपारी तीन ते पाच या वेळेत राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी,सूचना,तक्रारी विचारात घेवून तक्रारी सोडविण्यासाठी ‘कामगार पालक दिनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी उपस्थित रहावे असे आवाहन आगार व्यवस्थापक सुरेश शिंगाडे यांचे वतीने करण्यात आले आहे.