Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialसांगरूळ हायस्कूलच्या वतीने शाही परंपरेने दसरा महोत्सव..

सांगरूळ हायस्कूलच्या वतीने शाही परंपरेने दसरा महोत्सव..

सांगरूळ / वार्ताहर
सांगरूळचे ग्रामदैवत श्री जोतिबा देवालयाच्या नवरातकरऱ्यांचे सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने पुष्पवृष्टीसह विविध उपक्रम राबवत शाही परंपरेत स्वागत केले . शाळेच्या वतीने शिस्तबद्ध राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे नवरातकरऱ्यांसह ग्रामस्थांच्या मधून कौतुक होत आहे .
ग्रामदैवत ज्योतिर्लिंग देवालयाच्या पायथ्याशी डोंगरातच सांगरुळ हायस्कूलची नैसर्गिक वारसा लावलेली नेत्रदीपक इमारत आहे .ज्योतिर्लिंग देवालयाकडे जाणारे भक्त शाळेच्या क्रीडांगणावरनच ये जा करत असतात . शाळा – गाव – ग्रामस्थ – विद्यार्थी
यांची एकमेकांशी नाळ जोडण्यासाठी व, सांस्कृतिक व सामाजिक परंपरा, संस्कार जपणारी भारतीय परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रुजवण्यासाठी मागील वर्षापासून शाळेच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो .
शाही दसरा महोत्सांतर्गत जोतिबाच्या मानाच्या सासनकाठीचे पूजन आमदार प्रा जयंत असगावकर व त्यांच्या सुविद्य पत्नी अनु असगावकर यांच्या हस्ते करण्यात आले . पारंपारिक वेशभूषेत शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दुतर्फउभा राहून पाचेशेवर नवरातकरऱ्यांचे शाही परंपरेत पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात सवादय स्वागत केले .तसेच सर्व नवरात्रकरी स्त्री व पुरुषांना शाळेच्या वतीने ताक वाटप केले
यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी भावी पिढी शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत होण्यासाठी आपल्या पारंपारिक सण व उत्सव यांची परंपरा विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी शाळांमधून अशा उपक्रमाची गरज आहे .सांगरूळ हायस्कूलने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबर शाळा व ग्रामस्थ यांना जोडण्यासाठी उपयुक्त असणारा हा उपक्रम इतर शाळांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले .
प्रास्ताविक करताना प्राचार्य एस एम नाळे यांनी पूर्वजापासून गावातील जोतिबाचे भक्त आमच्या शाळेच्या प्रांगणातून ये जा करत असतात . दसरा महोत्सवात नऊ दिवस उपासना करून येणाऱ्या भक्तांचे स्वागत करण्याबरोबरच आपला हा धार्मिक व सांस्कृतिक ठेवा विद्यार्थ्यांच्या रुजवण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने गेल्या वर्षीपासून हा उपक्रम यशस्वीपणे सुरू असल्याचे सांगितले .
यावेळी सांगरुळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष य.ल. खाडे उपाध्यक्ष के.ना. जाधव , खजानणीस डी. जी. खाडे , संचालक बी.आर.नाळे , आ.गो.कासोटे , सदाशिव खाडे , गणपती नाळे उपराचार्य के.एन.पाटील , पर्यवेक्षक एस.के.पाटील , बी.डी. खाडे उपमुख्याध्यापक आर.जी. खाडे यांचेसह शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते . सूत्रसंचालन व आभार लुकेश कोळी यांनी मानले.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News