चिखली : भुयेवाडी ता. करवीर येथील दलित वस्ती सुधारणा अंतर्गत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या फंडातून 10 लाख निधी देण्यात आला.या निधीच्या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) व संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संभाजी पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मधुकर जांभळे,करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शिवाजी देसाई,भुयेवाडी गावचे सरपंच सचिन देवकुळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.