शिंगणापूर :
शिंगणापूर( ता करवीर ) येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेतून चार कोटी पच्याहत्तर लाख रुपये मंजूर करुन योजनेचे शुभारंभ मा.आ.चंद्रदीप नरके याचा हस्ते करणेत आला.
यावेळी नरके म्हणाले की शिंगणापूर गावाची वाढ झपाट्याने वाढ होत आहे .प्रत्येक काॅलनी मध्ये पाणी टंचाई मोठी होत आहे. नदी शेजारी असुनही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या पासुन महिला वर्गाना खुप ञासाला समोरे जावे लागते .याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाकडून भरपूर पाणी मिळावे म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा करता चार कोटी पच्याहत्तर लाख मंजूर करणेत आले .या माध्यमातून आता प्रत्येकाला भरपुर पाणी मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी युवा नेतृत्व अभिजित पाटील व त्यांचे मिञपरिवार मा.आ.चंद्रदिप नरके गटात प्रवेश केला या वेळी अनेक मान्यवरांचे भाषण झाले .
गोकुळ चे संचालक अजित नरके.संग्राम पाटील किरण पाटील.राजु दिवसे. जालिंदर मुंडे.अभिजित बागडे.रणजित पाटील अभिजित पाटील.अजित चोगले..रूपाली पाटील.अस्मिता पाटील.सतिश चोगले.आदी मान्य वर उपस्थित होते.
प्रास्ताविक आभार किशोर पाटील यानी केले.