Friday, January 16, 2026
Google search engine
HomeSocialक्षेत्र आदमापूर येथे बाळुमामांचा १३२ वा जन्मकाळ सोहळा उत्साहात..

क्षेत्र आदमापूर येथे बाळुमामांचा १३२ वा जन्मकाळ सोहळा उत्साहात..

मुदाळतिट्टा-प्रतिनिधी-
क्षेत्र आदमापूर(ता.भुदरगड )येथील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सद्गुरू बाळूमामा यांची १३२ वी जयंती उत्सव संत सद्गुरू बाळुमामा देवालय समिती, ग्रामस्थ व सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून मंगळवार दि.१५ ऑक्टोंबर २०२४ राेजी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला.
उत्सवानिमित्त बाळूमामांचा गाभारा जरबेरा,आॕरखीड,कार्नेशियन,जिप्सो,डच,गुलाब ,पुष्पामेघ अशा विविध रंगाच्या, विविध आकाराच्या १० ते १५ प्रकारच्या फुलांनी आकर्षकपणे सजवला होता
देवालयासमोर विविध रंगातील रांगोळीतून भक्तांचे लक्ष आकर्षित करत होत्या.संपूर्ण मंदिर व कळस लाईटींगने विविध रंगी दिसत होता.
सोमवार १४आॅक्टोंबर राेजी समाधी पुजन समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या शुभहस्ते विना पूजन झाले.यावेळी
संत ज्ञानेश्वरी पारायण ९व १२वा अध्याय संपन्न झाले.यानतर प्रवचन सेवा ह.भ.प. बाळकृष्ण परीट व ह.भ.प.नानासाहेब पाटील व ह भ प.पुंडलिक गवळी याची प्रवचन सेवा झाली.
मंगळवार १५ आॅक्टोंबर रोजी
सकाळी आठ ते अकरा बाळूमामा विजय ग्रंथ पारायण संपन्न झाले.दुपारी जन्मोत्सव कीर्तन पुष्प ह. भ. प. रामचंद्र पाटील यांचे झाले. दुपारी ४ वा.२३ मिनिटांनी बाळुमामांच्या पाळण्यावर भक्तांनी पुष्पवृष्ठी करुन जन्मकाळ सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला.महिला भाविकांनी पाळणा गीत म्हणून भाविकांना मंत्रमुग्ध केले.बाळुमामांच्या मंदिराभोवती दिंडी प्रदर्शन होऊन महाप्रसादाने जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.
यावेळी भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. सर्व भाविकांनी बाळूमामांचे व पाळण्याचे दर्शन घेण्यासाठी आणि फूले वाहण्यासाठी गर्दी केली. यावेळी सुंठवडा वाटण्यात आला. तसेच बाळूमामांचे निर्वाणस्थळ श्री. मरगुबाई मंदिरामधून समाधी स्थळी श्रींच्या अश्वासह भंडारा आणून श्री चा पालखी सोहळा झाला. भाविकांनी व सुवासिनींनी पालखीचे व अश्वाचे औक्षण केले.
श्रींच्या पाळण्याचे पूजन सौ.राजनंदिनी भोसले व उपस्थितीत सुवासिनी यांच्या हस्ते करण्यात आले. ढोल कैताळांच्या निनादामध्ये भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण झाली. यानंतर मंदीरा भोवती श्रींचा पालखी सोहळा झाला. जन्मकाळ सोहळ्याची महाप्रसादाने सांगता झाली.
या जन्मकाळ उत्सव शांततेत पार पाडणेसाठी कोल्हापूरसह, भुदरगड व कागल पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी,भागातुन आलेल्या सुरक्षा रक्षकांनी व देवस्थानचे कर्मचारी,आदमापूर व परीसरातील तरुण युवक,ग्रामस्थ, भक्तांसाठी सुरक्षा व सुरक्षितता काटेकोरपणे ठेवल्याने भक्तांना बाळुमामांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेता आला.
यावेळी अध्यक्ष धैर्यशील भोसले , कार्याध्यक्ष रागिणी खडके, सचिव संदीप मगदूम,देवालयाचे विश्वस्त दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंत पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, लक्ष्मण होडगे,रामाण्णा मरेगुर्दि,तमण्णा मासरेडी, पुंडलिक होसमनी, बसवराज देसाई ग्रामस्थ आदिसह परिसरातील भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News