कोल्हापूर:
निवडणुकीचे बिगुल वाजले असून जिल्हयात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट कोल्हापूर यांनी करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार राहुल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
निवृत्ती संघ हॉल,फुलेवाडी येथे हा कार्यकर्ता मेळावा त्यांनी घेतला. या जाहीर पाठिंब्याबद्दल राहुल पाटील यांनी गवई गटाचे आभार मानत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी कार्यक्रमास आरपीआय (गवई)गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे , पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष निवास सडोलीकर, भिमराव कांबळे, आर एस कांबळे,शशिकांत कांबळे ,पन्हाळा तालुका अध्यक्ष भगवान कांबळे ,करवीर ता. अध्यक्ष अशोक घाडगे, गगनबावडा ता . अध्यक्ष सर्जेराव कांबळे ,बी एच पाटील ,भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील , संचालक शिवाजी कारंडे , सचिन चौगुले (मा. सरपंच) वडणगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.