दोनवडे :
करवीर फाटा येथे गावठी पिस्तूल विक्री करण्यास आलेल्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
कृष्णात सुरेश कलकूटकी वय 38 राहणार खुपीरे ता.करवीर असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई आज दुपारी झाली आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र करमळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दोनवडे फाटा येथे वीट भट्टी जवळ ही कारवाई झाली त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल, 3 जिवंत राउंड व होंडा ऍक्टिवा मोटरसायकल असा सुमारे 1 लाख 51 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके, पोलिस अमंलदार संतोष बरगे, गजानन गुरव, सागर चौगले, वैभव पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.