वाकरे – येथील पैलवान शंकर तोडकर फाउंडेशन च्या वतीने विविध स्पर्धा परीक्षेतील व क्रीडा स्पर्धेतील यशस्वी युवक युवतींचा सत्कार करण्यात आला .
वाकरे गावातील युवक रजत रामचंद्र पाटील यांची एस.आर.पी.एफ पोलीस पदी अभिषेक बाबुराव पाटील यांची मंत्रालय क्लार्क पदी ,अक्षय ज्योतीराम सातपुते व निलेश कर्णिक यांची जिल्हा परिषद शिक्षक पदी व प्रवीण नामदेव कांबळे यांची सांगरूळ शिक्षण संस्थेत शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल तसेच पैलवान शंकर तोडकर हायस्कूलचे विद्यार्थी रितेश दत्तात्रय मोरे व श्रेया कृष्णात आळवेकर यांनी तालुकास्तरीय हातोडा फेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल या सर्वांचा शंकर तोडकर फाउंडेशनच्या वतीने यशवंत बँकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक हिंदुराव तोडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना यशवंत बँकेचे संचालक हिंदुराव तोडकर यांनी गावातील या युवक व युवतीनी स्वतःची व गावाचे नाव उज्वल केले आहे .भविष्यात त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून चांगला नावलौकिक मिळवावा असे आवाहन केले
यावेळी जोतिर्लिंग शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी तोडकर, माजी सरपंच वसंत तोडकर, कृष्णात आळवेकर, डी एस मोरे , यशवंत सातपुते,दिनकर सातपुते, अशोक तोडकर, सखाराम गायकवाड उपस्थित होते.