कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघावर शिवसेना उद्धव बा. ठाकरे पक्षाने पुन्हा आपला दावा केला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याग करून सर्व शिवसैनिकांनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली. त्यामुळे आता काँग्रेसने मोठ मन करून हि जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी असे, प्रसिद्धीपत्रक शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकी वेळी शहरातील शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी रात्रीचा दिवस करून काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या आजवरच्या इतिहासात तब्बल सहा वेळा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. प्रत्येक वेळी इतर पक्षांनी शिवसैनिकांना गृहीत धरू नये उत्तरची जागा शिवसेनेला मिळाली नसल्यास शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीचा आदेश म्हणून प्रामाणिकपणे काम करतील यात शंका नाही मात्र याचे दूर परिणाम उत्तर सह आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात देखील होऊ शकतात. अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली.



