बालिंगा(मोहन कांबळे): कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याने यलो अलर्ट दिलेला होता. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरूच आहे.अश्या परिस्थितीमध्ये आज भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह धुवांधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने नागरिकांनी सावध राहावे अश्या सुचना केल्या आहेत.
आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नष्टे इमारतीच्या मोबाईल टॉवर वर आणि उंचगावमधील एका घरावर वीज पडली. मालमत्तेचे काही प्रमाणात नुकसान झाले मात्र कोणतीही जीवितहानी नाही.