शिगणापुर: (प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची (डी एन इ 136 ) राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवार (दि, 19) सकाळी 11 वाजता आंबेवाडी( ता.करवीर ) येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित करण्यात आले आहे
या बैठकीत राज्यातून 300 ते 400 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत यानिमित्ताने सत्कार व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा मेळावा देखील होणार आहे महाराष्ट्र राज्य महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले. यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे राज्य अध्यक्ष संजीव निकम राज्य सरचिटणीस सुचित घरत मार्गदर्शन करणार आहेत
तरी कार्यक्रमास जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी उपस्थित राहावे .असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी संघटना कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष एन.के. कुंभार ,जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख शिवाजी वाडकर ,कार्याध्यक्ष राजेंद्र भोपळे, सचिव चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले.