कळे: मरळी ता. पन्हाळा येथील ज्ञानेश्वर माऊली सेवा सोसायटी व शिवपार्वती दूध संस्था या संस्थेचे पदाधिकारी तसेच मा.डे.सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आदी कार्यकर्ते यांनी चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केला.
पक्षप्रवेशाच्या माध्यमातून पक्षावर आणि माझ्यावर लोक दाखवत असणारा विश्वास नेहमीच सार्थ ठेऊ असे मत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
यावेळी अविनाश गुरव, विजय डवरी, बाजीराव पाटील, शिवाजी पवार, अनिल डवरी, गणपती कांबळे, नामदेव डवरी, शिवाजी दि. पाटील, महादेव पाटील, बाबुराव गुरव, सदाशिव पाटील, पांडुरंग पवार, तुकाराम रोहिले, बाबुराव डवरी, भैरवनाथ डवरी, किसन डवरी, सुवर्णा चौगुले, अलका रोहिले, हर्षद पाटील, अनिकेत गुरव, विश्वनाथ डवरी, नंदकुमार पाटील, रामचंद्र पवार, विष्णुपंत पवार, सतीश दांगट, कृष्णात ज्ञानू कांबळे, धोंडीराम कांबळे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.