शिंगणापुर: ( प्रतिनिधी)
कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे काम कौतुकास्पद आहे. असे गौरउदगार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष संजीवजी निकम यांनी काढले. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी राज्य कार्यकारिणी त्रेमासिक सभा,सत्कार सोहळा,तसेच ग्रामपंचायत अधिकारी मेळावा आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले होते. आंबेवाडी ता. करवीर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवनामध्ये राज्य सरचिटणीस सुचित घरत. यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी निकम यांनी ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या वेतनश्रेणी, जुनी पेन्शन योजना, उपदान मंजुरी बाबत सभागृहाला सखोल मार्गदर्शन केले.
उमेशचंद्र चिलबुले यांनी संघटना बळकट करण्यासाठी योगदान बाबत मार्गदर्शन केले. आदर्श ग्रामपंचायत अधिकारी, सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व पाहुणे व 34 जिल्ह्यातून सभेसाठी आलेल्या मान्यवरांचा कोल्हापूरची आई श्री.महालक्ष्मी प्रतिमा, रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा असलेला कोल्हापूर दर्शन फोटो, कोल्हापुरी गुळ, कापडी पिशवी, पुष्पगुछ देऊन भव्य सत्कार करण्यात आला
. सर्व मान्यवरानी आपल्या मनोगतात जिल्हा अध्यक्ष एन. के. कुंभार. यांच्यासह सर्व टीमचे कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी( DNE 136)ने केलेल्या नियोजन बद्ध, नेटक्या कार्यक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी ( D. N. E. 136 ) त्रेमासिक सभा, सत्कार सोहळा आनंदात पार पडला.
यावेळी उमेशचंद्र चिलबुले, संजीवजी निकम,सुचित घरत. यांच्या हस्ते माजी जिल्हा सरचिटणीस के. टी. सिताप,जिल्हा अध्यक्ष एन. के. कुंभार, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत सूर्यवंशी,यांचा राज्य संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी चे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.