Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICAL"हाय होल्टेज" दक्षिणमध्ये पून्हा पाटील विरुद्ध महाडिक पारंपरिक लढत

“हाय होल्टेज” दक्षिणमध्ये पून्हा पाटील विरुद्ध महाडिक पारंपरिक लढत

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघात आज भाजपने विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांच्यासमोर अमल महाडिक यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. मागील विधानसभेचा वचपा काढण्यासाठी भाजपने ही रणनीती आखली आहे. तोडीस तोड ची उमेदवारी असल्याने ही निवडणूक जिल्ह्यात लक्षवेधी असणार आहे.
माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील या पारंपरिक विरोधकांमध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये या उमेदवारीने जोरदार चुरस वाढली आहे.
या मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच सोशल वॉर सुरू आहे. त्यामुळे येणारी ही निवडणूक कोणत्या थराला जाऊ शकते? याचे गणित आता मांडता येणार नाही.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News