कोल्हापूर:
जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागात सोन्याचे दागिने चोरी होत असल्याच्या तक्रारी नंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.
त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ज्योती उर्फ जोताबाई नामदेव पाटील राहणार -जयसिंगपूर तालुका शिरोळ हिच्यावर काही दिवसांपासून पाळक ठेवली होती. ती कोल्हापूर येथील ताराराणी चौकात दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे 27 ग्रॅम वजनाचा सोन्याचा दोन पदरी चोरीचा धनहार आढळून आला. तिने हा दागिना वडगाव बाजार समिती ,इचलकरंजी येथे एका महिले कडून चोरल्याची कबुली दिली. तिच्याकडून करवीर तालुका पोलीस ठाणे व देवरुख पोलीस ठाणे हद्दीतील आणखीन दागिने चोरल्याचा संशय आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपअधीक्षक शेष मोरे, पोलिस अमलदार महेश खोत,शुभम संकपाळ ,संजय कुंभार, महेश पाटील, सुशील पाटील, कृष्णात पिंगळे, अमित मर्दाने, धनश्री पाटील यांनी ही कार्यवाही केली.