कोल्हापूर : महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. करवीर मधून राष्ट्रवादी काँग्रेसच निर्णायक पक्ष ठरणार आहे. ‘करवीर’चा आमदार महायुतीचाच करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, करवीर तालुका अध्यक्ष शिवाजी देसाई, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अरविंद कारंडे, करवीर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संभाजी पाटील, युवराज पाटील, मयूर जांभळे, वसंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.