Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomePOLITICALकोथळी येथे आज चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा..

कोथळी येथे आज चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा..

कोथळी (तानाजी पोवार):
कोथळी ता करवीर येथे आज करवीर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गट व महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ भोगावती परिसर व परिते जिल्हा परिषद मतदार संघ अंतर्गत कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न होत आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता 15 ऑक्टोंबर पासून सुरू झाली असली तर निवडणूक कार्यक्रम 22 ऑक्टोबर 2024 पासून अधिकृतपणे सुरू झालाय उमेदवारी फॉर्म भरण्यास सुरुवात झाली असून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा धुमधडाका सुरू केला आहे करवीर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे व महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांचा परिते जिल्हा परिषद मतदार संघ व भोगावती परिसर यातील कार्यकर्त्यांचा मेळावा कोथळी तालुका करवीर येथील अमृत वर्षा या सांस्कृतिक सभागृहामध्ये आज सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे मागील आठवड्यातच याच सांस्कृतिक हॉलमध्ये काँग्रेसचे व महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ शेतकरी कामगार पक्षाने करवीर तालुका शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मोठ्या प्रमाणात घेतला होता त्यानुसार आज होणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचा मेळाव्यातून एक शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे त्यानुसार परिसरातील शिवसेना व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठे शक्ती प्रदर्शन करतील अशी उत्सुकता लागून राहिली आहे या मेळाव्याला करवीरचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चद्रदीप नरके गोकुळचे संचालक अजित नरके पक्षाचे अन्य नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News