सावंतवाडी: माझा शिवसेना प्रवेश निश्चित झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी सायंकाळी ४ वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या सभेत आपण शिवसेनेत प्रवेश करणार असे, माजी खासदार तथा भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
,आपले वडील नारायण राणेंची राजकीय सुरुवात ज्या पक्षातून ज्या धनुष्यबाण चिन्हावर झाली त्याच चिन्हावर मला निवडणूक लढविण्याची संधी मिळत आहे याचे मला आनंद व समाधान आहे असे राणे यांनी सांगितले . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपले प्रेम होते . आजही आपले प्रेम आहे. यापुढेही राहणार आहे असे सांगत निवडणूक जिंकायची हे आपले प्रथम उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.