कोथळी करवीर/ तानाजी पोवार:
चंद्रदीप नरके हा प्रत्येक वाडी वस्ती वरती पोहोचलेला कार्यकर्ता आहे. मात्र विरोधी नेत्यांना मतदारसंघातील गावांची नावे देखील माहित नाही असा टोला महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी लगावला ते कोथळी तालुका करवीर येथे कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलत होते.
विरोधी नेते फक्त निवडणुकीपुरते मतदारसंघात फिरून काय उपयोग होणार नाही असेही नरके यावेळी म्हणाले.
दरम्यान हसूर कांचनवाडी परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून नरके यांना पाठिंबा दिला.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत करवीर मतदार संघासाठी चंद्रदीप नरके यांची उमेदवारी निश्चित असून नरके आणि मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे करवीर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश आणि मेळावा हजारोंच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला . प्रारंभी अजित पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर हंबीरराव पाटील ,नामदेव पाटील सदाशिव पाटील, विक्रांत पाटील ,मोहन पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
यावेळी बोलताना नरके म्हणाले काँग्रेसने 60 वर्षे सत्ता असताना अनेकदा निवडणुका जिंकून वचनामे बदलायचं काम केलं महायुतीचा कारभार मात्र खटक्यावर बोट जाग्यावर पलटी याप्रमाणे आहे अनेक धाडसी निर्णय घेतले आहे विकासाचे व्हिजन घेऊन चालणाऱ्या विचारांचा उमेदवार म्हणून येत्या निवडणुकीमध्ये मला निवडून द्या जनतेसाठी आमदारकी समर्पित करेन असेही ते म्हणाले . या मेळाव्याला राजेंद्र पाटील, तुकाराम पाटील ,एस आर पाटील, उदय चव्हाण ,अजित नरके , रमेश वरुटे ,तानाजी जाधव, बाळासाहेब मेडशिंगे यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.