उंचगाव :
उंचगांव येथील माणिक पाटील, निगवे खालसा येथील बाबासो निगवेकर तसेच दिंडनेर्ली येथील माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य राजू चौगले या महाडिक गटातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह माझ्या व आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, शशिकांत पाटील (चुयेकर), जि. प. माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, गणेश काळे, कीर्ती मसुटे, जे.एस. माने, हंबीरराव वाडकर, शांताराम बोटे, संभाजी बोटे, सुहास पाटील, उमेश पाटील, श्रीपती पाटील, सागर पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



