कागल,प्रतिनिधी:
मराठा भवन बांधकामाचा मोठा गाजावाजा करत दोन वेळा भूमिपूजनाचे नारळ फोडले. निधी येऊनही पण मराठा समाजाच्या अस्मितेचे मराठा भवन न बांधता पालकमंत्र्यानी मराठा समाजाची घोर फसवणूक केली. अशी घनाघाती टीका शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केली
करनुर (ता.कागल)येथील आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी सरपंच आनंदराव पाटील होते.
श्री. घाटगे पुढे म्हणाले,” पंचवीस वर्षे आमदार, मंत्री असतांना मुश्रीफांनी आपल्या भाषणातून शाळा बांधण्यासाठी किती निधी आणला हे कधी सांगितले नाही. कारण त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टदारांना शाळा बांधकामाचा निधीमध्ये स्वारश नाही. म्हणून निधी आणलाच नाही. पंचवीस वर्षात त्यांनी किती नवीन शाळा बांधल्या.? किती शाळांचे वर्ग डिजिटल झालेत? मंत्री महोदयांकडे गावातील सर्वसामान्य माणूस काम घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्या गावातील त्यांच्या कार्यकर्त्याला किंवा लाडक्या कॉन्टॅक्टरला विचारल्याशिवाय त्या माणसाचे काम केले नाही.त्यांना न विचारता काम केल्याचे दाखवा समरजितसिंह घाटगे राजकारण सोडेल.
व्यासपीठावर शाहूचे संचालक युवराज पाटील, विक्रमसिंह घाटगे (वंदुरकर), कुमार पाटील, तानाजी शिंदे, कविता घाटगे, कृष्णात धनगर आदी उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी,राष्ट्रीय काँग्रेसचे सागर कोंडेकर,उत्तम पाचगावे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सतीश धनगर स्वागत यांनी केले.जयसिंग घाटगे यांनी आभार मानले.