कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे या दोघांनीही उमेदवारी अर्ज आज गुरुपुष्यामृत च्या मुहूर्तावर सकाळी पावणे अकरा वाजता सादर केले
तसेच राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर,तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, अखिलेशराजे घाटगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर सौ. घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, धैर्यशिल इंगळे, डोंगरी विकास समिती सदस्या विजया निंबाळकर यांची उपस्थिती होती.



