Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeपट्टणकोडोलीत किराणा दुकानात पकडला अडीच लाखांचा गुटखा..!

पट्टणकोडोलीत किराणा दुकानात पकडला अडीच लाखांचा गुटखा..!

कोल्हापूर: पट्टणकोडोली परिसरात अवैध्यरित्या गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पट्टणकोडोली ता.हातकणंगले येथील जाधव गल्ली ,
गणेश मंदिर शेजारी असलेल्या शिंदे किराणा दुकानात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली यावेळी तेथे दोन लाख 29 हजार रुपयांचा गुटखा मिळून आला.
पोलिसांनी मुद्देमालासह दुकानदार संदीप दगडू शिंदे याला ताब्यात घेतला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर ,उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार युवराज पाटील,निवृत्ती माळी, अमित सर्जे, राजेंद्र व्हरांडेकर यांनी ही कारवाई केली.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News