Friday, January 16, 2026
Google search engine
HomeSocialफुलेवाडी -बालिंगा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य ; काम बंद करण्याचा तंटामुक्ती अध्यक्ष अनिल...

फुलेवाडी -बालिंगा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य ; काम बंद करण्याचा तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पोवार यांचा ईशारा..

फुलेवाडी -बालिंगा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य: काम बंद करण्याचा तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पोवार यांचा ईशारा
बालिंगा(प्रतिनिधी): कोल्हापूर गगनबावडा गोवा नविन राष्ट्रीय महामार्ग तयार करणे रखडत रखडत चालू आहे. फुलेवाडी ते बालिंगा या रस्त्यावर काम अत्यंत संथगतीने चालू आहे. गेली वर्षभर झाले कामकाज रखडत चालु आहे ,याचा त्रास सामान्य जनतेला होत असुन वहानांच्या गर्दिने दररोज ट्रफीक जाम होत असुन वहातुक संथ गतीने चालू असल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
बालिंगा गावातील तसेच मुख्य रस्त्यावरील दुतर्फा दुकाने असल्याने दुकानदार व ग्राहक यांना धुळीच्या त्रासाने लोक हैराण झाले आहेत. या मुळे लोकं खोकला,सर्दि आणि घसा दुखीने त्रस्त झाले आहेत. अनेक दुकानदार कान, नाक,घसा तज्ञास दाखवून उपचार घेत आहेत, त्याचा नाहक त्यांना त्रास होत असुन आर्थिक नुकसान होत आहे.
हा राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर तयार करावा तसेच रस्त्यावर दररोज पाणी तीन वेळा फवारावे म्हणजे धुळीचा त्रास तरी कमी होईल अन्यथा सर्व दुकानदार यांचे वतीने काम बंद आंदोलन करण्याचा ईशारा बालिंगे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पोवार यांनी दिला आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News